भरती - ओहोटी

 भरती-ओहोटी :

* समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येते, तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते. सागरजलाच्या या हालचालींना अनुक्रमे भरती व ओहोटी म्हणतात, 

* काही अपवाद वगळता, जगभरातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर अशा प्रकारे नैसर्गिकरीत्या भरती-ओहोटी येत असते.

भरती-ओहोटीचे चक्र :

* भरती-ओहोटी ही सागरजलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. 

* भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते. तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते. 

* दर १२ तास २५ मिनिटांनी भरती-ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते.

भरती-ओहोटीचे प्रकार:

१) उधाणाची भरती-ओहोटी : चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावास्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती-ओहोटी येते. उधाणाची भरती सरासरी भरतीपेक्षा फारच मोठी असते. उधाणाच्या भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते. या ओहोटीला उधाणाची ओहोटी म्हणतात.

उधाणाची भरती - ओहोटी

* भांगाची भरती-ओहोटी : 

चंद्र पृथ्वीभोवती फिरताना शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला पृथ्वी आणि सूर्य यांच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. त्यामुळे या दोन दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. त्यामुळे या दोन दिवशी भागाची भरती ओहोटी येते. भागाच्या भरतीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व भांगाच्या ओहोटीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी उतरते.

भांगाची भरती - ओहोटी

* भरती-ओहोटीचे परिणाम :

 * भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो.

* भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.

* भरती-ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत.

* भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात.

* भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.

* भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते.

* भरती-ओहोटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.

* भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments