ग्रहणे :
पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५० चा कोन करते. परिणामी, चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो. प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो १८०°असतो. असे असले तरीही प्रत्येक अमावास्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत, म्हणूनच प्रत्येक अमावास्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. (आकृती २.४ पहा) काही पौर्णिमा व अमावास्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात.
* सूर्यग्रहणे :
* सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल एका सरळ रेषेत व समपातळीत असतात, त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते,तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते.
* चंद्राची सावली दोन प्रकारे पडते. मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात विरळ असते.
* खग्रास सूर्यग्रहण : पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची दाट सावली पड़ते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजेखग्रास सूर्यग्रहण' होय.खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते.
*खंडग्रास सूर्यग्रहण : पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची विरळ सावली पडते, तेथून सूर्य अंशतः झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे 'खंडग्रास सूर्यग्रहण' होय.
* कंकणाकृती सूर्यग्रहण :
काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. ती अवकाशातच संपते. त्यामुळे अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची केवळ प्रकाशमान कहा एखादा बांगडीप्रमाणे दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते.
* चंद्रग्रहणे :चंद्र व सूर्य यांच्यादरम्यान पृथ्वी एकाच पातळीत आल्यास चंद्रग्रहण घडते.
* चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गातून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो, तेव्हा चंद्रग्रहण घडून येते.
* पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. दाट सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला गेल्यास 'खग्रास' चंद्रग्रहण होते.
* पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. दाट सावलीमुळे चंद्र अंशतः झाकला गेल्यास खंडग्रास चंद्रग्रहण होते.
सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये :
(१) सूर्यग्रहण अमावास्येला होते, परंतु ते प्रत्येक अमावास्येला होत नाही.
(२) सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते.
(३) खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ७ मिनिटे २० सेकंद (४४० सेकंद) असतो.
चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये:
(१) चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु ते प्रत्येक पौर्णिमेला होत नाही.
(२) सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते.
३) खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे इतका असतो.
0 Comments