राष्ट्रध्वजाचा सर्वात वरचा रंग कोणता असतो?

1.पांढरा                    2.केशरी 

3.निळा                    4.हिरवा.

उत्तर : पर्याय क्र.2.केशरी

स्पष्टीकरण : राष्ट्रध्वजाचाा सर्वात वरचा रंग केशरी असतो.



आपल्या देशाचा तिरंगा ध्वज आपले पहिले राष्ट्रीय चिन्ह आहे. केशरी, पांढरा आणि हिरवा या क्रमाने समान आकाराचे आडवे पट्टे अशी आपल्या राष्ट्रध्वजाची रचना व रंगसंगती असून मधल्या पट्यावर अशोक चक्र आहे. 

* केशरी रंग त्याग, तपस्या, धैर्य आणि बलिदान यांचे प्रतीक असून, पांढरा रंग सत्य, पावित्र्य, शांतता आणि प्रकाशाचे द्योतक आहे. हिरवा रंग वनस्पती जीवनाशी व निसर्गाच्या समृद्धतेशी नाते सांगतो. अशोक चक्र हे निळ्या रंगातील धर्मचक्र आहे. या ध्वजाखाली काम करणाऱ्यांना सत्याचे व धर्माचे आचरण करण्याचा संदेश देते. यातील २४ आरे हे आपल्याला २४ तास सतत धर्मानुसार प्रगतिपथावर व गतिमान राहण्याचा संदेश देतात.

* राष्ट्रध्वजाच्या या विशिष्ट रचनेची निश्चिती पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, काका कालेलकर, डॉ पट्टाभि सीतारामय्या, सरदार तारासिंग आणि डॉ. ना. सु. हर्डीकर या सात सभासदांच्या समितीने केली आहे. घटना समितीने राष्ट्रध्वजाची वरील रचना २२ जुलै, १९४७ रोजी संमत केली.

Post a Comment

0 Comments