महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

1. मुख्याधिकारी   2.महानगरपालिकाआयुक्त 

3.महापौर            4.उप महापौर

उत्तर : पर्याय क्र. 2.महानगरपालिका आयुक्त

स्पष्टीकरण : महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.

         महानगरपालिकेचे प्रशासन

 महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. उदा., एखादया महानगरपालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तो तयार करतो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो.

Post a Comment

0 Comments